कवी राज शास्त्री
☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 36 ☆
☆ वृद्धापकाळातील वेदना… ☆
वृद्धापकाळातील यातना
बोलक्या, तरी अबोल होती
स्व-अस्तित्व मिटतांना
डोळ्यांत अश्रू तरळती…०१
वृद्धापकाळातील यातना
थकवा प्रचंड जाणवतो
आधार हवा, प्रत्येक क्षणाला
जवळचाच तेव्हा, मागे सरकतो… ०२
वृद्धापकाळातील यातना
विधिलिखित असतात
परिवर्तन, नियम सृष्टीचा
विषद, लिलया करून देतात…०३
वृद्धापकाळातील यातना
भोगल्याशिवाय, गत्यंतर नाही
प्रभू स्मरण करत रहावे
तोच आपला, भार वाही…०४
वृद्धापकाळातील यातना
न, संपणारा विषय हा
“राज” हे कैसे, प्रस्तुत करू
अनुभव, प्रत्येकाला येणार पहा…०५
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈