सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ विचार आपला आपला…☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
☆
देतेस रोज पाणी उपकार जर म्हणावे
देतो फळे फुले ते उपकार का नसावे
*
देतोस काय मजला हाती धुपाटणे हे
देऊनही मते मी, लाचार काय व्हावे
*
ते पारधी ससा मी, हातातलाच त्यांच्या
मी नेहमी तयांच्या, खाद्यास का मरावे
*
चोरी करून सुटका होईल का सदाही
तू एकदाच माझ्या पंजात सापडावे
*
दिसतोस फक्त जेव्हा, येतात नेमणूका
खुर्ची तुला मिळावी, मी तर उगा जळावे
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈