श्रीशैल चौगुले
☆ कवितेचा उत्सव ☆ कृष्ण-लिला… ☆ श्रीशैल चौगुले ☆
मज भान न राहिले
आज जे डोळे पाहिले
भाव मनाने वाहिले
भक्तीत श्रीकृष्ण झाले.
प्रहरी सरीत तिरी
मुकुट शोभीत शिरी
शेला सावरीत जरी
श्रीरंग दर्शनी आले.
देहास लाजरे पंख
सुखाचे मारीत डंख
हृदय घायाळ निःशंक
मोरपीस सुंदर डोले.
काय सांगू फुलले घाट
वृंदावनीचा थाटमाट
उलगडीत धुके दाट
प्रत्यक्ष मजशी बोले.
बासरी मधूर धुंद
म्हणे, मज तो मुकूंद
‘मज आवडशी छंद
तुजसवे रासलीले.’
मज भगवंती भया
मी न राधा देवा गया
सखी गोकुळची दया
जन्मास पुण्य लाभले.
दशदिशा फाके ऊषा
कृष्ण सावळा अमिषा
गौळणीत निंदा हशा
राधीकेशी सख्य जुळले.
म्हणती प्रीय ती राधा
भव आहे देह बाधा
मनमोहन तो साधा
संकट तुझे टळले.
मज छेडीत सदैव क्षण
ठेवी प्रेमाचे अंतरी ऋण
भाव निर्मळ तृप्त रक्षण
साद कसे न कळले.
दिनेश पुर्वेस आला
सये,तोची नंदलाला
तुज भासले जे रुप
सृष्टीत सुक्ष्म-स्थूले.
गोपीका आनंदे नाचे
स्वरुप आगळे साचे
मज वेड हे कशाचे
‘राधा- कृष्ण’युग ल्याले.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈