श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ शोध ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

शोधून सापडेना आनंद हरवलेला

गुंता कसा सुटेना गुंत्यात गुंतलेला

 *

नाजूक बंधनानी हळव्या व्यथा पुरवल्या

आहेच जाच त्यांचा पदरास बांधलेला

 *

सोडून सर्व काही झालो फकीर आता

झोळीत माल भरला नाहीच संपलेला

 *

वैराग्य मिरवताना दडपून जीव जातो

उरतो मनात मागे संसार भोगलेला

 *

आदर्श जीवनाचे चुकते गणीत तेव्हा

छळतो तना मनाला अंधार दाटलेला

 *

जगणे जगावयाचे साधे सुबोध नाही

असते शिवावयाचा अंदाज फाटलेला

 *

जगण्यास लागणारा आधार मागण्याला

माणूस माणसाने असतोच शोधलेला

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments