श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ नकोच ती एकरुपता… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
जल न पिते जला
वृक्ष न खाती आपुले फळा
देण्यातचि सुख आहे
जाण तू रे लेकरा…
*
हिरा शोभे कोंदणात
कनक शोभे अलंकारात
नको एकरुपता मज
शिष्यचि राहो तुझिया भक्तीत…
*
ऊन्हाच्या झळा सोसेन
तेव्हाच कळेल शितलता
दग्ध होवून जळो पापभार
नकोच मज ती एकरुपता….
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈