सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ खरे सुख… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
(आनंदकंद)
☆
पैशात मोजलेले असते खरेच सुख का
दारिद्र्य शिकविते ते नसते खरेच सुख का
*
बापास कष्ट पडती पण लेक आयतोबा
खाऊन मेद वाढे फसते खरेच सुख का
*
शेतात राबतो अन कष्टास तोड नाही
पाहून पीक हिरवे कसते खरेच सुख का
*
मिळतेय वारसांना आज्यास कष्ट पडले
भांडून भाग मिळतो डसते खरेच सुख का
*
भाग्यात खूप होते ताटात सांडले पण
झोळीच फाटकी जर हसते खरेच सुख का
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈