श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “पहाटेस…” ☆ श्री आशिष मुळे ☆

पहाटेस अजूनही

उगवते माझी व्याकुळता

जशी गादीवर धुक्याच्या

सरल्या सांजेची मुग्धता

*

फिरतात आताशा हात

रिकाम्या अंतरात

शोधती कान माझे

तुझ्या कंकणांची साद

*

पुढे गेलीस तू

मागे सोडून ती पहाट

आता उरले चालणे

दिवसाची ही वाट

*

त्या क्षणात बद्ध अन या क्षणात स्तब्ध

तुझे ते कोमल सामर्थ्य

त्या क्षणात निःशब्द अन या शब्दात बद्ध

हे माझे आर्त काव्य

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments