सुश्री अरूणा मुल्हेरकर
☆ कवितेचा उत्सव ☆ ज्ञान विज्ञान… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
शतक उगवले एकविसावे
युगानुयुगे सरली
विज्ञानाच्या विकासाने
मनास मने येऊनी भिडली….
जग हे बंद मुठीत
व्हाट्सएप्प , फेस बुक
ट्विटर, इन्स्टाग्रॅम
सारे कसे एका क्षणांत…..
तू कुठे अन् मी कुठे
पर्वा नाही कशाची
फेस टाईम करता करता
अनुभूति प्रत्यक्ष भेटीची….
पत्रे होती लिहिली आम्ही
करण्या वास्त पुस्त
उत्तर मिळता मिळता गेले
किमान सात दिन मस्त…..
आता कसे सगळेच फास्ट
कुठेही असा जगाच्या पाठीवर
वैज्ञानिकांच्या प्रयत्नांनी
मानव पोहोचला मंगळावर….
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
छान..विज्ञान कविता