सुश्री शीला पतकी 

? कवितेचा उत्सव ?

☆ “आई छे मम्मी…” ☆ सुश्री शीला पतकी 

(आदरणीय कवी यशवंत.. यांचे स्मरण करून🙏)

मम्मी म्हणून कोणी आईस हाक मारी

ती हाक येईकानी मजहोय शोककारी

*

नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी

आई कुणा म्हणू मी मम्मीच दारी दारी

*

ही न्यूनता भाषेची चित्ता सदा विदारी

ती माया तू मराठी केलीस काग परकी

*

जाडे भरडेच लुगडे ते केस बांधलेले

अन भव्य त्या कपाळी ते चंद्र सूर्य कोरलेले

*

सारेच लुप्त आता गाऊन घाली मम्मी

ते केस कापलेले अन गंध ना कपाळी

*

शाळेतून घराला येई भुकेजला मी

मोबाईल हाती म्हणते तू थांब दोन मिनिटे

*

मिनिटात दोन मज पुढे ती ठेवील न्यूडल वाटी

अन रिअलच्या रसाचा लावेल ग्लास ओठी

*

मी पोरंका बिचारा काही पडेना ताटी

तुळशीपुढे आता ती लावे न सांजवाती

*

उष्ट्या तशा मुखाच्याघेईन ती हो पापा

म्हणते आजीसच आताहे हायजिनिक नाही

*

चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई

गोठ्यात वासराना या चाटतात गाई

*

वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही

भित भित माझ्या खोलीत झोपी जाई

*

आई मला हवी तू घे जवळी ना जरागे

आई हवी मला ती मम्मी नकोच बाई!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments