श्री कमलाकर नाईक
संक्षिप्त परिचय
शिक्षण – बी.काॅम., डी.बी.एम्.
सम्प्रत्ति – गॅमन इंडिया लि. मधून निवृत्त.
☆ कवितेचा उत्सव ☆ सावळी… ☆ श्री कमलाकर नाईक ☆
गो-या आई पोटी जन्मा आले
ना कोणा आनंद ना सुख झाले
नाही आले घरी वाजत गाजत
नाही केले कुणी माझे स्वागत
नावालाच माझे बारसे केले
सावळीचे नाव शामली झाले
नव्हता कोणाचा स्पर्श मायेचा
नव्हता कोणाचा शब्द प्रेमाचा
नव्हते जगात कोणी माझ्यासाठी
रानफूल झाले माझी मीच मोठी
उरी स्वप्न सैनिक होणे देशासाठी
झाले पूर्ण देवा, उभा माझ्या पाठी
मिडियाने चढवले डोईवर मला
गणगोतानी केले जवळ मजला
आता चिमुकली सावळी शामली
जनसागराच्या प्रेमात बुडून गेली.
© श्री कमलाकर नाईक
फोन नं 9702923636
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈