सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ कवितेचा उत्सव ☆ ऋतू सोहळे… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

सनईच्या सुरावटीने

वाटचाल सुरू झाली

ऋतुऋतुंचे सोहळे

आनंद वाटत गेली ||

 

नव्या कळ्या उमलल्या

वसंत फुलूनी आला

बाललीलांच्या संगती

धूंवाधार बरसला ||

 

कित्येक नाती जुळत गेली

फुलली जणू तारांगणे

अखंड त्यातूनी बरसते

शरदाचे सुखद चांदणे ||

 

ज्येष्ठांचे हात सूटत गेले

पानगळ धीराने साहिली

नातवंडांच्या रूपाने

सुरेख पालवी फुलली  ||

 

तुझ्या-माझ्या सोबतीने

ऋतुसोहळे सजले

संसाराचे भावविश्व

मनाजोगते फुलले ||

 

सनईचे सूर आजही

करिती साथसंगत

तुझी माझी अशीच राहो

अखंड जन्मसोबत ||

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments