☆ कवितेचा उत्सव ☆ पाहुनी ही एकता ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆
उगवू दे नी उजळूदे, साऱ्या मनांचे सूर्य आता ।
अंधाराला भय वाटू दे, पाहुनी ही एकता ।।धृ।।
मनसूर्याचा जन्म व्हावा, घेऊनी किरण माणुसकीचे ।
करुणेचा स्रोत पाझरावा, दर्शन व्ह्यावे प्रीतीचे ।
मानवतेचा जय व्हावा, यावी निववळ नीरामयता ।
अंधाराला भय वाटावे, पाहुनी ही एकता ।।1।।
पेटलेली आग हृदयी, नव सार्थकी लागावी ।
धार जिभेच्या तलवारीची, घाव घालण्या नसावी ।
भेद सारे आता मिटावे, जाणता नि अजाणता ।
अंधाराला भय वाटावे, पाहुनी ही एकता ।।2।।
© सौ अश्विनी कुलकर्णी
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
अप्रतिम काव्य रचना