कवितेचा उत्सव
☆ आला मिरूग शिवंला ☆ श्री प्रकाश लावंड ☆
आलं आभाळ भरून
बये उचल तू पाय
झटं घेतय वासरू
रानी हंबरते गाय
आलं आलं झाकाळून
सांज झाली येरवाळी
लगाबगा चाल कशी
घर घालतंय हाळी
आलं दाटून काहूर
वारं झपकं मारतं
वीज चमकून उठं
तार सोन्याची उमटं
आला मिरूग शिवंला
संगं घेऊन पखाली
पावसाच्या स्वागताला
उतावीळ झाली काळी
© श्री प्रकाश लावंड
करमाळा जि.सोलापूर.
मोबा 9021497977
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈