प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ ।।शुभंम् भवतु ।। ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद “अभिव्यक्ती”
वाढदिवसाच्या शुभेच्छा,जडवलीत भक्ती …
फुलो, फळो नि वाढो मासिक हीच मनोकामना
बदलत्या काळाशी आहे, साऱ्यांचा सामना ..
मात करूया परिस्थितीवर लिहिते राहू सारे
बदलतील हो नक्की पहा हो एक दिवस वारे
ग्रहण लागते ढग ही येती, असते निव्वळ छाया
दवडती न चंद्र सूर्य हे क्षण एक तरी ना वाया ..
अव्याहत हो कार्य चालते छाया विरून जाती
कुणी न धरावी व्यर्थ कशाची मनातून ती भीती
व्यस्त असावे, आपल्या कार्यी लेखणीस चालवू
सारस्वत हो आपण सारे नवा मनू घडवू ..
लेखणीतून घडते क्रांती,विचार उदया येतो
नेतृत्वाने समाज सारा प्रगती पथावर जातो
खारीचा आपण उचलू वाटा, ध्येयपथावर चालू
शब्दसुमने मोलाची ती भर त्यात हो घालू …
“अभिव्यक्ती” स्वातंत्र्याचा घेऊ पुरा फायदा
नवनविन ती विचारपुष्पे करू पहा वायदा
उंचीला नेऊ या मासिक,होऊ वचन बद्ध
सारस्वत हो आपण सारे, देऊ आज शब्द …
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
(९७६३६०५६४२)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈