सौ.वंदना अशोक हुळबत्ते
कवितेचा उत्सव
☆ नाच रे उंदरा….☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆
(विडंबन-रचना – ‘नाच मोरा आंब्याच्या वनात’ या चालीवर)
नाच रे उंदरा
शेंगांच्या पोत्यात
नाच रे उंदरा नाच || ध्रु||
तुझी मेजवानी
झाली रे
शेंगांची पोती
संपली रे
मालकाची काठी
पडेल तुझ्या पाठी
कळवळून जरा तू…नाच
नाच रे उंदरा
शेंगांच्या पोत्यात…||१||
फोलपट सारी
खाल्लीस रे
तोंडाला इजा
झाली रे
दुखेल तुझ्या पोटात
नाचत राहशील पोत्यात
दवा जराशी घेवून जा
नाच रे उंदारा
शेंगांच्या पोत्यात…||२||
किती ही घाण
केलीस रे
तुझी लेकरे
जेवली रे
नको आता थांबू
वेळ नको दवडू
बिळात तुझ्या पळून जा
नाच रे उंदारा
शेंगांच्या पोत्यात….||३||
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
सांगली
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈