कवितेचा उत्सव
☆ श्रावण नवलाई… ☆ श्री गौतम कांबळे ☆
उद्धव (मात्रावृत्त- २+८+२+२)
सप्तरंगी श्रावणाचा
घ्यावा अंगावर शेला
गाऊ आनंद तराणे
श्रावण सजूनिया आला
रान ओलेचिंब झाले
हिरव्या शालूने नटले
दान निसर्गाचे सारे
झाडे वेलीनी लुटले
रानफुलांसंगे आता
माळरानही गंधाळे
गंध पिऊनी पशुपक्षी
वारा वेगे हुंदाडे
सोहळाश्रावण मनाला
भूलवून माझ्या जाई
जीवनात आनंदाची
यावी वाटे नवलाई
© श्री गौतम कांबळे
सांगली
९४२१२२२८३४
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈