सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ गोकूळ अष्टमी निमित्त – नंदलाल ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
(आर्या वृत्त)
वसुदेवाचा सुत हरी
नंदाचा तो असे कान्हा
जन्मदात्री देवकी
माता यशोदेस फुटला पान्हा
श्रावण वद्य अष्टमी
यमुनेसी हो आला पूर
मध्यरात्री तान्ह्यास
वसुदेवे नेले गोकुळी दूर
बाळ वाढे गोकुळी
आनंदित यशोदामाई
नंदलालाची कीर्ति
त्रिखंडात दूरवर ही जाई
चोरी नवनीताची
गोकुळवासी होती तंग
केव्हा लोणी खाऊ
गाई राखण्यात मी तर दंग
उघड उघड मुख बाळा
दाव मजसी काय ते असे
उघडताना मुखासी
यशोदेसी विराटची रूप दिसे
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈