श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ गोपाळकाला ☆ श्रीशैल चौगुले ☆
मी न कृष्ण तु न राधिका
तरी कसे मन वृंदावन.
मी न कृष्ण तु न रुक्मिणी
प्रेम भक्ति धन संतमिरा.
मी न कृष्ण तु न ती भामा
पारिजात हा तुळसीत.
मी न कृष्ण तु न गौळण
तरी रास देही गोपाळकाला.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈