कवी राज शास्त्री
साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 46
☆ आयुष्याची संध्याकाळ… ☆
आयुष्याची संध्याकाळ
खूप भयाण ठरते
आपले असून सर्व काही
मिळत काहीच नसते…!!
आयुष्याची संध्याकाळ
विचार करायला लावते
तुरुंगवास की, अज्ञातवास
कोडे कधीच नं सुटते…!!
आयुष्याची संध्याकाळ
सर्व पर-स्वाधीन सर्व होते
राहून सामोर पाणी तरी
घशाला नित, कोरड येते…!!
आयुष्याची संध्याकाळ
एकटे आपण सदैव असतो
चौघांच्या खांद्यावर जातांना
घरात गरम गरम भात शिजतो…!!
आयुष्याची संध्याकाळ
प्रत्येकाला भोगावी लागते
कितीही कमवा धन परंतू
शेवटी आमंत्रण “निधन” असते
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈