सौ.मंजुषा सुधीर आफळे
अल्प परीचय
आयुष्याच्या मध्य वळणावर विसाव्याच्या क्षणी माझी कविता फुलली. १५० कविता केल्या आहेत. पुस्तक अजून काढले नाही. काव्यसंमेलनात वाचन केले आहे. सांगली आकाशवाणी साठी सुध्दा वाचन केले आहे…
कवितेचा उत्सव
☆ आरती मंगळागौरीची ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆
जय देवी जय देवी
जय मंगळागौरी
श्रावण मासी तुझे
व्रत धरीते मनी…||धृ||
भक्तिभावे ओवाळीन
तुज सोनिया ताटी
पूजनासी आणिली
सोळा परींची पत्री
नाना अलंकारे
शोभते शिवरमणी ||१||
अभ्यंग स्नानादिक
सुमनांचा भार
धूप, दीप, नैवेद्य
रांधीती नार
हर्षे अर्पण करिते
तू सौभाग्यदायनी ||२||
अर्पिते सप्रेमे
तन मन धनासी
शरणागत मी,
सेवा मानून घे माझी
कृपाळू शिवकांते
मज रक्षावे संकटी.||३||
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
१/९/२०२१
विश्रामबाग, सांगली.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈