कवी राज शास्त्री
साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 47
☆ परस्पर प्रेम… ☆
(अंत्य-ओळ काव्य.)
मनाची औदार्यता असावी
मनाची औदार्यता जपावी
मन उदार करून सहज
स्नेहाची उधळण करावी…!!
स्नेहाची उधळण करावी
सहिष्णूता, ती जपावी
वाट्यातील वाटा देतांना
अहंकाराची झालर नसावी…!!
अहंकाराची झालर नसावी
सहजतेने मुक्त व्हावे
क्षणभंगूर जीवनात आपुल्या
काहीतरी निर्मळ कार्य करावे…!!
काहीतरी निर्मळ कार्य करावे
कीर्ती गंध पसरवून द्यावा
शेवटी काय राहते भूव-री
याचा विचार स्वतः करावा…!!
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈