श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ श्रीगणेश ☆ श्रीशैल चौगुले ☆
आत्मतृप्तीचा देव
विघ्नविनाशक भाव
ब्रम्हांडाचा कृपाकर
श्रीगणेश.
ज्ञानदानाचा आद्य
वेदांत प्रतिपाद्य
सजीवबुध्दि साध्य
श्रीगणेश.
पंचभूताचा सर्वेश
शिव-पार्वती पुत्र
विधीलिखीचा नाथ
श्रीगणेश.
सुखकर्ता-दुःखहर्ता
कर्ता नि करविता
तोच देव देह आत्मा
श्रीगणेश.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈