☆ कवितेचा उत्सव ☆ तो कोण ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆
या फुलांना या धरेला
गंध तोची कोण देतो
तो अनादी सर्वसाक्षी
ईश सकला व्यापितो
तरुही बोले,पर्ण बोले
नाद तो झंकारतो
कोण स्पर्शे,तरल तनुला
त्या करांनी सुखवितो
झोपलेल्या त्या मुकुला
गुज स्वप्नी सांगतो
दिवस येता,मुग्ध रूपा
कोण तोची हसवितो
प्राणीमात्रा रूप द्याया
सृष्टीकर्मा जागतो
आस जैसी,फलित तैसे
सत्य हे साकारतो.
© सुश्री दीप्ती कुलकर्णी
कोल्हापूर.
भ्र. 9552448461
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
त्या फुलांच्या गंधकोशी…..ची आठवण यावी अशी कविता