☆ कवितेचा उत्सव ☆ पाऊले चालती चालती ☆ श्रीमती सुधा भोगले ☆
पाऊले चालती चालती अध्यात्माची वाट
साधकाच्या मानसात चैतन्याची झाली पहाट || ध्रु ||
पूज्य गुरूंनी लावला सत्संगाचा लळा
इथे येतो दिव्यत्वाचा प्रत्ययही वेगळा || १ ||
फुलती इथे हरीभक्तिचे हिरवागार मळे
गुरुच्या सहवासाने जीवा-शिवाची भेट कळे || २ ||
प्रभूचरणाशी समर्पणाने अहंकार लोपला
कैवल्याचे दर्शन होता आत्मा पावन झाला || ३ ||
अध्यात्माच्या वाटेवरचा गिरविला ओनामा
ब्रम्हपदी पोहचू आम्ही कां मोक्ष धामा || ४ ||
पाऊले चालती चालती अध्यात्माची वाट
साधकाच्या मानसात चैतन्याची झाली पहाट || ध्रु ||
© श्रीमती सुधा भोगले
९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुस्वागतम् आणि अभिनंदन.