सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ यशाहुनही प्रयत्न सुंदर ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

(जेष्ठोत्सव, पुणे मधील  द्वितीय  क्रमांक प्राप्त काव्यपूर्ती रचना.)

रमत गमत कोळी भिंतीवर चढे

वरून पावसाने खाली तो पडे

सूकत जमीन सारी ऊन ते पडे

रमत गमत कोळी पुन्हा वरचढे ||

 

संकटे येती जाती किती संसारात

भीक त्याला न घाली तोचि भाग्यवंत

पुन्हा यत्न करतो तो ठरतो यशवंत

प्रयत्नांते यश लाभे हाचि खरा मंत्र ||

 

प्रयत्ने वाळूचे कण रगडणे शक्य आहे

प्रयत्नांती परमेश्वर वसे हेचि सत्य आहे

धीर सोडू नको रे यश तुझेच आहे

पुढे पुढे चालत जा यशोमंदिर आहे ||

 

हार-जीत हा तर खेळाचा भाग आहे

पुन्हा नव्याने लढणे हाची नेम आहे

विवेकी संयत लढती यशस्वी होत आहे

जीवनाच्या खेळाचा हाच नियम आहे ||

 

बुद्धिवादी तू तर हे नियम जाणतोस

जिद्दीने लढूनी संकटांना हरवतोस

नवी नवी क्षितिजे अचूक गाठतोस

थांबला तो संपला हे सत्य जाणतोस ||

 

कोळ्याप्रमाणे पडणे उठणे तुला जमेल

जिद्द मात्र हरू नको शेवटी यश गवसेल

राखेतूनी ‘मन फिनिक्स’  जर तो उडेल

यशाच्या शिखरावरी  निश्चित विसावेल ||

 

(यातल्या पहिल्या चार ओळी दिल्या होत्या आणि पुढील ४५ मिनिटात तिथेच कविता लिहायची होती.)

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments