श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
? पेन्शनचे टेन्शन ! ? श्री प्रमोद वामन वर्तक
पुण्य नगरीच्या बँकेतली
एक सांगतो तुम्हां गोष्ट,
एका पेक्षा एक पेन्शनर
तेथे राहती सारे खाष्ट !
बँकेत शिरतांना बघून
पेन्शनर खडूस साठ्या,
पडती जोशी कॅशरच्या
कपाळी खूप आठ्या !
“काय म्हणता साठे,
आज कसे आलात,
गेल्या मासाचे पेन्शन
परवाच घेवून गेलात !”
“अरे तेंव्हा बघ विसरलो
शंका ‘मनीची’ विचारायला,
अधिक महिन्याचे पेन्शन
कधी येऊ मी न्यायला ?”
ऐकून त्यांचे ते बोलणे
जोश्या मारी कपाळी हात,
या ‘मल’ मासाने माझा
असा करावा ना घात !
© श्री प्रमोद वामन वर्तक
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈