कवितेचा उत्सव
☆ हरीची ऐकताच मुरली.. ☆ स्व. योगिनी विश्वनाथ जोगळेकर ☆
हरीची ऐकताच मुरली
राधिका राधिका न उरली
आसावरीचे सूर कोवळे
पहाटवारा पिउनी आले
घुसळण करिता हात थांबले
डे-यामधूनी दह्यादुधातूनी यमुना अवतरली
वेड असे कैसे विसरावे ?
फुलातुनी गंधा तोडावे
नभातुनी रंगा वगळावे
वेडी राधा,वेडा माधव वेडी ती मुरली.
राधिका राधिका न उरली.
स्व. योगिनी विश्वनाथ जोगळेकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈