कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव
☆ लक्ष्मी पूजन ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
अमावस्या अश्विनाची
दिवाळीचा मुख्य सण
अंधाराला सारूनीया
प्रकाशात न्हाते मन. . . . !
धनलक्ष्मी सहवास
घरी नित्य लाभण्याला
करू लक्षुमी पूजन
हवे सौख्य जीवनाला… !
धन आणि अलंकार
राहो अक्षय टिकून
सुवर्णाच्या पाऊलाने
यावे सौख्य तेजाळून.. . . !
प्राप्त लक्षुमीचे धन
हवा तिचा सहवास
तिच्या साथीनेच व्हावा
सारा जीवन प्रवास. . . . !
सुकामेवा , अनारसे
फलादिक शाही मेवा
साफल्याची तेजारती
जपू समाधानी ठेवा.
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 9371319798.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈