श्री मुबारक उमराणी
कवितेचा उत्सव
☆ सूर… ☆ श्री मुबारक उमराणी ☆
आता नाय, मग नाय
असं म्हणून चालेल काय ?
खर काय? खोटं काय ?
बोलून एकदा टाक बाय
ओढी पाय ,होतं काय
दुसरं आम्हा येतंय काय?
याला फसव, त्याला फसव
याच्या शिवाय केलंय काय?
करी चाडी, भरी माडी
न भरणारी झाली वेडी
सत्यालाच डांबर पुस
खोटी फुस घरात घूस
माणूस कात्रून केल्या चिंध्या
झाडाच्याही खाल्ल्या फांद्या
बदनाम करुन पार बेडा
असत्याच्या तोंडात पेढा
याला पिडा, त्याला पिडा
खात फिरे पान विडा
रस्ता झाला पीकदाणी
अभद्र बोले याची वाणी
इथं फेक, तिथं फेक
वाढ दिनी मोठा केक
शब्दात धार करी गार
याच्याच गळ्यात घाली हार
सगळेच म्हणे चूक चूक
शहाणा आता झाला मुक
इथं पार्टी, तिथं पार्टी
वेडी झाली सारी कार्टी
दारु पूर, सोडी घुर
शहाणाही पळे दूर
मारून ठोसा, बदला नुर
सत्याचा ऐकू येईल सूर
© श्री मुबारक उमराणी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈