कवितेचा उत्सव
☆ मी… ☆ कै मंगेश पाडगावकर ☆
मी झुळझुळणारा वारा,
मी सुंदर मोरपिसारा
निळ्या निळ्या या आभाळतील
तारा लुकलुकणारा !
मी पारिजात फुलणारा
मी सुगंध अन् झुलणारा,
ऊन कोवळे झेलीत झेलीत
पक्षी भिरभिरणारा !
मी पाऊस कोसळणारा
मी डोंगर अन् न्हाणारा
झरा चिमुकला आनंदाने
गात गात जाणारा !
कै मंगेश पाडगावकर
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈