कवितेचा उत्सव
☆ एकच सत्य… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
कर दोन तरी,
नमस्कार एक.
दोन्हीं डोळ्यातले,
भाव एकएक.
दोन पायांखाली,
वाट एकएक.
भक्ती प्रणय वेगळे,
प्रेम एकएक.
मीरा राधा वेगळीही,
श्याम एकएक.
भिन्नता वेगळी,
संकल्पना एकएक.
जरी प्रार्थना वेगळ्या,
असो मागणेही एक.
तुझ्या माझ्यातले द्वैत,
व्हावे एकएक.
न उरावे अद्वैत,
सत्य समजावे एक.
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈