श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
? मा धु क री ! ? श्री प्रमोद वामन वर्तक
(हल्लीच्या पिढीला, “माधुकरी” या शब्दाचा अर्थ ठाऊक असणे तसे कठीणच ! पण माझ्या पिढीतल्या सगळ्यांना हा शब्द परिचित असावा ! आपण जर प्रत्येक कडव्यातील पहिले अक्षर उभे वाचलेत, तर कवितेचे शीर्षक तयार होईल !)
मागावी पाच घरी जाऊन
वीतभर पोटासाठी भिक्षा
गत जन्मीचे असावे पाप
देवाने दिली असे शिक्षा
धुवांधार असो पाऊस
अथवा वैशाखाचे ऊन
रोज फिरून दारोदारी
मी करावे उदर भरण
कवाडे कोणी बंद करती
लागट बोलून तोंडावर
सर्वच घरी मज असा
नाही अनुभव खरोखर
रीत ती रोज सांभाळून
मागत फिरे माधुकरी
सदा राहून हसतमुख
शल्य दाबतसे मी उरी
© श्री प्रमोद वामन वर्तक
संपर्क – (सिंगापूर) +6594708959, मो – 9892561086, ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈