प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ एक धडा मज …. ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

क्षणात येते क्षणात जाते लहर सुखाची

कायमची ती असेल जवळी समजत गेले…

 

दु:ख्ख असूनी कायम जवळी पचवत गेले

सहवासाने कायम त्याला जवळी केले ….

 

लळा लागला दु:ख्खाचा त्या कळले नाही

आयुष्याचा भाग तयाला समजत गेले …

 

आता सुखाला उरली नाही जागा जवळी

खेदाने त्या जागा सहजी भरत गेले …

 

कळत नाही फरक आता सुखदु:ख्खातील

अंगावरची लव जणू  कुरवाळीत गेले …

 

सहवासाने सहजी जिरती गोष्टी सगळ्या

एक धडा मज जीवन तेव्हा शिकवून गेले …

 

आताच रुळले सारे संगती कळून आले

“सुखदु:ख्खे समेकृत्वा “जीवन होऊन गेले….

 

© प्रा.सौ.सुमती पवार 

नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.अलका सानप

अप्रतिम ??