श्री विजय गावडे
कवितेचा उत्सव
☆ लाल परी…..☆ श्री विजय गावडे ☆
एसटी कामगार दुखवट्यात!
कम्बारडा मोडला कचाट्यात!!
लाल परी लाल परी
कीत्या बसले डायवर घरी?
कंडक्टरांची झोळी कीत्या
बसली कोनात खुंटेवरी?
काय सांगा दादा तुका
लाल परी डोळ्यात खुपा
गरीबाची कोणाक चाड
त्येंची आपली धनात वाढ
मंत्री आपल्ये गाडयेत फिरती
सामान्यांची चाल धरतीवरती
कोनाक ठाये कित्येक मेले
वि्लिनिकरणात गडप झाले
सुने रस्ते, सुने आगार
गाव पडले गपगार
लुटले जाती गरीब धोंडारी
मंत्री संत्री राजकारण करी
इले नेते, गेले नेते
घोळ घालती अ जानते
एसटी कामगार बाबडो बेजार
कोणी तरी करारे विचार!
© श्री विजय लक्ष्मण गावडे
कांदिवली, मुंबई
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈