सौ .कल्पना कुंभार
कवितेचा उत्सव
☆ आठवणीतील शाळा ☆ सौ .कल्पना कुंभार ☆
आठवणीतील शाळा
आज आठवणीतच भरली
घंटा वाजू लागता
वर्गातील रेलचेल वाढली..
भेटले सगळे सवंगडी
त्याच हसऱ्या चेहऱ्याने..
किलबिलाट सुरू झाला
भिजले क्षण आनंदाने..
किती निरागस होते ते दिवस
आता समजतंय..
बालपणच चांगलं होतं
हे पुरतं उमजतय..
गुरफटले गेलोय आता सगळेच
आभासी जगात..
पुन्हा जाऊन बसता येईल का
मित्रांसमवेत त्याच वर्गात..??
© सौ .कल्पना कुंभार
?मनकल्प ?
इचलकरंजी
मोबाईल नंबर : 9822038378
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈