श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
कवितेचा उत्सव
☆ फरक…. ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
बोलण्यास्तव गोड त्यांनी तिळगुळ वाटला
सहज जगण्यात अमुच्या गोडवा
नकळत दाटला
अपेक्षेने स्वार्थ सिद्धी च्या त्यांनी उपवास ही धरीयला
उपाशी नको पोरे म्हणुनी माऊलीने तो सहज घडविला
दिसण्या सुंदर त्यांनी घाम ही गाळला
तडजोडीत जीवनाच्या आम्ही
नकळत तो ढाळला
शेकण्यास्ताव हात त्यांनी होळ्या भडकविल्या
आम्ही कवडश्याच्या प्रकाशाने
मशाली पेटविल्या
मिरविण्या स्व त्यांनी किती भूमिका वठवील्या
जगता जगता सहजतेने आम्ही
माणूसच घडविला
© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈