कवितेचा उत्सव
☆ ☆ नाव ☆ कै. पुरुषोत्तम शिवराम रेगे ☆
उलटलेल्या
या दुपारच्या वेळी
ऊन स्वतःला विसरलेलं असतं.
क्वचित कुठे
त्याचे पाण्याने मुडपलेले ढलपे दिसतात
जरि मोकळ्या मोतिया आकाशाला
त्याचा मागमूसही नसतो
भोवताली पाहताना
पायाखालची वाट हरवलेली असते.
तुला
हे सांगितलं तर खर वाटणार नाही…
त्या उन्हाला मी तुझं नाव दिलेलं असतं.
`
– कै. पुरुषोत्तम शिवराम रेगे (पु.शि रेगे)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈