सौ. स्वाती रामचंद्र कोरे
कवितेचा उत्सव
☆ श्वास मराठी… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆
(रोही पंचाक्षरी रचना)
रोमारोमांत
मनामनांत
माय मराठी
वसे श्वासांत..१
असे प्राचीन
भासे नवीन
मायबोलीशी
घट्ट ही वीण..२
फुले पालवी
रूप भुलवी
साहित्यातून
मने मोहवी..३
नाद घुमतो
नित्य गर्जतो
देश विदेशी
डंका वाजतो..४
लोभसवाणे
रूप देखणे
फिके पडते
शुभ्र चांदणे..५
भाषा थोरवी
किती वर्णावी
माय माऊली
मनी जपावी..६
माज मराठी
साज मराठी
गौरवास्पद
माझी मराठी..७
© सौ. स्वाती रामचंद्र कोरे
भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली
मो.9096818972
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈