श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 103 – तू आणि मी…! ☆
तू आणि मी
मिळून पाहिलेली सारीचं स्वप्नं
आजही …
मनाच्या अडगळीत
तशीच पडून आहेत
तू आलीस की
आपण ती स्वप्न झटकून
पुन्हा त्यात नवे रंग भरूया…
फक्त तू येताना…
तुझ्याही मनाच्या अडगळीतली
सारीच स्वप्न घेऊन ये…!
कारण…
माझ्या मनातल्या
अडगळीतले
काही स्वप्नांचे रंग
आता..,रंगवण्याच्या
पलीकडे गेलेले आहेत…!
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈