प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर
कवितेचा उत्सव
☆ मायेचे पीठ… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆
पहाटच्या पाऱ्यामंधी
माझी माय दळे पीठ ,
घरघरत्या जात्यावरी
तिचा घास दळे नीट .
जात्याच्या भवताली
मायेचे पीठ सांडे,
सुखी घरादारासाठी
दुःख जात्याशीच मांडे .
रोज दळता दळण
माय गात ऱ्हाते ओवी ,
तिच्या ममतेत सारे
घरदार सुखी होई .
माय दळून कांडून
अशी झिजतच जाते ,
घरघरत्या जात्याला
तिचे जितेपण येते .
© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर
बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली
मो ९४२११२५३५७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈