श्री मुबारक उमराणी
कवितेचा उत्सव
☆ सारंगपाणी… ☆ श्री मुबारक उमराणी ☆
वारा शिवारी गार शिवारी
झुलतो शाळू भार शिवारी
मनात फुलते रान गाणी गं
पाणी पाजते आप्पाची राणी गं
नथ हसता,माळ बोलते
भाळी कुंकूम टिळा फुलतो
हाती कंकणाचा नाद खुलतो
पैंजण खेळे माती पाणी गं
वारा सळसळ झाड हलवी
मनात फुलते पान पालवी
वसंत कोकिळ मला बोलवी
मनात नाचता मीही गाते गाणी गं
मोहर अांबा मनात घुमतो
वेली फुलांचा गंध झुमतो
जाई जुई शेवंता रंग चुमतो
कळी हसता पायी खेळे पाणी गं
माळावरी ती झालर फुलांची
हलत वा-यासवे खेळे धुलाशी
पक्षीपाखरु पंखी रंग फुलांचे
अप्पा हसे माझा सारंगपाणी गं
© श्री मुबारक उमराणी
शामरावनगर, सांगली
मो.९७६६०८१०९७.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈