महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 73
☆ हाक तुला अंतरीची… ☆
(अष्ट-अक्षरी…)
हाक तुला अंतरीची
ऐक कृष्णा या दीनाची
नसे तुझ्याविना कोणी
आस तुझ्या दर्शनाची…!!
दाव तुझे रूप देवा
भावा आहे माझा भोळा
पावा वाजवी कृपाळा
नको अव्हेरू या वेळा…!!
दोषी आहे मीच खरा
तुला ओळखलेच नाही
आता करितो विनंती
स्नेह भावे मज पाही…!!
राज नम्र शुद्ध भावे
दास म्हणवितो तुझा
प्रेम तुझे अपेक्षित
स्वार्थ पुरवावा माझा…!!
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈