श्री सुजित कदम
कवितेचा उत्सव
☆ सुजित साहित्य # 104 – एक कविता तिची माझी..! ☆
एक कविता तिची माझी ..
रोज भेटते फेसबुक वरती .
कधी भिजलेल्या पानांची ..
कधी कोसळत्या सरींची ..
कधी निथळत्या थेंबाची ..
तर कधी.. हळूवार पावसाची…!
एक कविता तिची माझी ..
रोज भेटते फेसबुक वरती.
कधी गुलाबांच्या फुलांची ..
कधी पाकळ्यांवरच्या दवांची ..
कधी गार गार वा-याची ..
तर कधी.. गुणगुणां-या गाण्यांची…!
एक कविता तिची माझी ..
रोज भेटते फेसबुक वरती .
कधी वाहणा-या पाण्याची..
कधी सुंदर सुंदर शिंपल्याची ..
कधी अनोळखी वाटेवरची ..
तर कधी ..फुलपाखरांच्या पंखावरची…!
एक कविता तिची माझी ..
रोज भेटते फेसबुक वरती.
कधी उगवत्या सुर्याची ..
कधी धावणा-या ढगांची..
कधी कोवळ्या ऊन्हाची ..
तर कधी पुर्ण.. अपूर्ण सायंकाळची…!
एक कविता तिची माझी ..
रोज भेटते फेसबुक वरती .
कधी काळ्या कुट्ट काळोखाची..
कधी चंद्र आणि चांदण्यांची ..
कधी जपलेल्या आठवणींची ..
तर कधी.. ओलावलेल्या पापण्यांची…!
एक कविता तिची माझी ..
रोज भेटते फेसबुक वरती .
कधी पहील्या वहील्या भेटीची ..
कधी गोड गुलाबी प्रेमाची ..
कधी त्याच्या तिच्या विरहाची ..
तर कधी.. शांत निवांत क्षणांची ..!
एक कविता तिची माझी ..
रोज भेटते फेसबुक वरती .
कधी तिच्या मनातली ..
कधी माझ्या मनातली..
एक कविता तिची माझी ..
रोज भेटते फेसबुक वरती..!
© सुजित कदम
संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़ रोड,पुणे 30
मो. 7276282626
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈