सौ. वंदना अशोक हुळबत्ते
कवितेचा उत्सव
☆ कलाकृती… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
तेच तिखट तेच मीठ
तोच गॅस तिचं भांडी
स्वैपाकाला…..
रोज वेगळी चव
कधी मनाची
कधी जनाची
तेची अक्षरे तेच शब्द
तेच भाव तेच उमाळे
कविता उमलते
कधी मनाची
कधी फुकाची
तेच रंग
तसाच कुंचला
जसे अंतरंग
तसा आविष्कार साधला
स्वैपाक काय कविता काय
एक….. कलाकृती
ती साधते
कलाकारच्या साधनेत
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
मो.९६५७४९०८९२
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈