श्रीमती रंजना मधुकरराव लसणे
कवितेचा उत्सव
☆ रंजना जी यांचे साहित्य # 94 – समयसुचकता ☆
जाणलीस तू स्त्री जातीची अगतिकता.।
धन्य तुझी समयसुचकता।।धृ।।
दीन दलित बुडाले अधःकारी।
पिळवणूक करती अत्याचारी।
स्त्रीही दासी बनली घरोघरी ।
बदलण्या समाजाची मानसिकता।।१।।
हाती शिक्षणाची मशाल।
अंगी साहसही विशाल।
संगे ज्योतिबांची ढाल।
आणि निश्चयाची दृढता।।२।।
दीन दुःखी करून गोळा।
लागला बालिकांना लळा।
फुलविला आक्षर मळा।
आणली वैचारिक भव्यता।।३।।
तुझ्या कष्टाची प्रचिती।
आली बहरून प्रगती ।
थांबली प्रथा ही सती।
स्त्री दास्याची ही मुक्ताता।।४।।
ज्ञानज्योत प्रकाशली।
घरकले उजळली।
घेऊन विचारांचा वसा माऊली।
तुझ्या लेकी करती
अज्ञान सांगता।।५।।
© रंजना मधुकर लसणे
आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली
9960128105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈