श्रीमती अनुराधा फाटक
कवितेचा उत्सव
☆ होळी… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
हाती घेऊन पिचकारी
कृष्ण आला नदीवरी
नव्हत्या तेथे गोपी
नव्हती त्याची राधा !
आली नाही राधा
कसली तिला बाधा
कृष्ण न्याहाळू लागला
नदीत पाचोळा दिसला !
कारण राधा न येण्याला
उमजले मग कृष्णाला
राधा होती पैलतीरी
सोबत फावडी खोरी !
गोपीही होत्या मशगुल
राधेच्या सोबतीला
धरून तशीच पिचकारी
राधे राधे थांब थांब !
पिचकारी नाही रंगाची
ती औषध फवारणीची
औषध आधी मारतो
मग पाचोळा काढतो !
गोपही आले धावून
टाकला गाळ काढून
मग रंगली त्यांची होळी
रंगाची पिचकारी निराळी
खेळाने जपले पर्यावरण
साजरा झाला होळी सण !
© श्रीमती अनुराधा फाटक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈