सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ मी आणि माझा पाऊस… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆
अवचित एक पावसाळी थेंब
अलवार आला ओंजळीत
आयुष्याच्या रेषांमधुनी
घालु लागला ओली फुंकर ….. १
भानावर येता वळुन पाहे मज
मला विचारी बघुन एक टक
सांग सखे मी काय देवु तुज
तुझ्या मनीचा होऊन पाऊस ….. २
तनामनातुन मी पाझरून
भिजविन तुजला प्रितीने चिंब
टिपेन माझ्या नयना मधुनी
तुझे अनामिक ओलेते यौवन ….. ३
ओघळुदे मनीचे सारे मळभ
उजळुन येईल प्रितीने तनमन
न्याहाळीन मी त्यातुन मग
नितळ तुझे ओलेते हे मन ….. ४
या क्षणांना सजवीन सखये
होऊन तुझ्या मनीचा पाऊस
जपुन ठेव या ओलाव्यास
तुझ्या मनीचा माझा पाऊस ….. ५
© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
Khupch sunder pallavi
पल्लवी कुलकर्णी यांच्या कविता अत्यंत तरल असतात.
अत्यंत भावपूर्ण कविता.
पुढील कवितेची आतुरतेने वाट पहातोय..