कवितेचा उत्सव
☆ साक्षीस चंद्र… ☆ कै अशोकजी परांजपे ☆
साक्षीस चंद्र आणि हळुवार स्पर्श होते
त्या भोगल्या क्षणांना नव्हतेच काही नाते
डोळ्यात बिंब होते नुसते भिजून गेले
नि:श्वास ते कळ्यांचे कोषांत लाजलेले
होता फुलून आला अंगावरी शहारा
गात्रांत मात्र राजा कसलेच भान नव्हते!
प्रतिसाद मूक होता ओठांत थांबलेला
तो शब्द रे सुखाचा ह्रदयात कोंदलेला
गालावरी खुळी रे कळ एक साचलेली
दुःखात की सुखी रे ,काहीच ज्ञात नव्हते !
– कै अशोकजी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈