श्री उदय गोपीनाथ पोवळे
कवितेचा उत्सव
☆ अबोला… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
नको ते रुसणे, नको ते रागावणे
नको तो अबोला, करी मनस्ताप
मनी तुझ्या काय, कळे न मला
मनी माझ्या भारी, असे तो ताप
चेहरा तुझा वाचता, न येई कोणाला
अंतरी तुझ्या काय, न कळे देवाला
असुरी भासे तो, चेहरा रुद्र तुझा
जन्म पामर तो, मानवाचा माझा
घटका आज जाती, त्या येती न परत
चटका मना देती, त्या येता न परत
नको ते धुमसणे, नको नजर चोरणे
बसुनी करू शांत, मनाशी बोलणे
मनाला मनाच्या घट्ट, मिठीत मालवू
हसत खेळत मस्त, दिवस घालवू
नको ते रुसणे, नको ते रागावणे
नको तो अबोला, होई पश्चाताप
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈