श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ ज्ञानसाद… ☆ श्रीशैल चौगुले ☆
कुठे देव आता
खाली येई ऊतरुन
भक्तीत भाव हे
मन जाई कातरुन.
वीट स्थीर नित्य
ऊभे कर कटेवरी
एक तरी सत्य
युग अहं वाटेवरी.
ऊगी गोड हास्य
मोह मोक्ष मुखावरी
चरणी जन्म हा
प्रकटे ना आत्मांतरी.
सोडू कि धरु हे
पाप-पुण्य वादभेद
शब्द अभंगात
घाले देवा ज्ञानसाद.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈